Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाकी येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील वाकी येथील ३५ वर्षीय तरूणाने वाकी शिवारातील शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

संतोष सुभाष मगरे (वय-३५) रा. वाकी ता. बोदवड ह.मु. चिंचोल ता. मुक्ताईनगर असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, संतोष मगरे हा मंगळवारी ४ जानेवारी रोजी बोदवड तालुक्यातील वाकी शिवारातील केशव दौलत पाटील यांच्या शेतात कामानिमित्त गेला होता. दरम्यान शेतातील बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आज बुधवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मयत तरूणाचे वडील सुभाष मगरे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.

Exit mobile version