Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वडली येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडली येथील २३ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नितीन शामराव शिंदे (वय-२३) रा. वडली ता. जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आला आहे. 

 

Exit mobile version