Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडकदेवळा येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील खडकदेवळा येथील ३० वर्षीय शेतमजुराने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असुन पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडकदेवळा ता. पाचोरा येथील भैय्या राघो मोरे (वय – ३०) या शेतमजुराने शिवारातील शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयत भैय्या राघो मोरे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक लहान भाऊ असा परिवार आहे. भैय्या मोरे यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे हे करत आहे. भैय्या मोरे याचे अकस्मात मृत्यूने खडकदेवळा व परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Exit mobile version