Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अधिक माहिती अशी की, यावल शहरातील श्रीराम नगर परिसरात राहणारे कन्हैय्या रामचंद्र मेढे (वय-२६) या तरूणाने आज सकाळी १० वाजता राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत गोकूळ मेढे यांच्या खबरीवरून यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. नितिन चव्हाण करीत आहे.  

 

Exit mobile version