Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका १७ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शेंदूर्णी येथे घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “भाग्यश्री दिलीप जावळे ही तरुणी नुकतीच अकरावीच्या वर्गातून उत्तीर्ण झाली होती. मंगळवार, दि.३ मे रोजी रात्री तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना लवकर लक्षात आल्यामुळे कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले.

अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असताना आज बुधवार, दि.४ मे रोजी दुपारी तिची प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून या घटनमुळे कुटुंबीयांनी रुग्णालयात आक्रोश केला. मृत भाग्यश्रीच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व एक बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version