Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जंगलात अल्पवयीन मुलाची गळफास घेवून आत्महत्या

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नागादेवी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने जंगलात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे.

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सीलाल उर्फ बुरा खुमान पावरा वय वर्षे 15 रा. नागादेवी ता. यावल हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. दरम्यान शनिवारी ३० एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने नागदेवी मंदिराच्या पुढे जंगलात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे. त्याने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळून आलेली नाही. हा प्रकार ग्रामस्थांच्या  लक्षात आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर यावल ग्रामीण पोलीसात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुखदेव पवार करत आहे.

Exit mobile version