Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हंबर्डी येथील मुलाची गळफास घेवून आत्महत्या; फैजपूर पोलीसात नोंद

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हंबर्डी येथील १७ वर्षीय मुलाने संतापाच्या भरात राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर असे की,  तालुक्यातील हंबर्डी नवीन वस्तीत राहणाऱ्या उदय हेमंत पाटील (वय-१७) यांने आज मंगळवारी २७ एप्रिल रोजी सकाळी १०ते ११ वाजेच्या सुमारास संतापाच्या घरात आपल्या राहत्या घरात छताच्या हुकला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यावेळी घरात कुणीही नव्हते, घरचे सदस्य घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आला आहे.  हेमंत सुधाकर पाटील यांचा एकुलता एक मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या अशा निधनाने कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळला आहे. मयत उदय पाटील याचे मृतदेह शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले. फैजपुर पोलीस स्टेशनला प्रशांत चंद्रकांत पाटील यांनी खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

Exit mobile version