Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मयूर सोसायटीत एकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील मयूर सोसायटीत ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

विठ्ठल आप्पा पाटील (वय-५५) रा. निमखेडी शिवार, मयूर हौसिंग सोसायटी जळगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, विठ्ठल पाटील हे पत्नीसह वास्तव्याला आहे. सोमवारी १० जानेवारी त्यांची पत्नी तालुक्यातील कानळदा येथील भावाकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या होत्या. मंगळवार ११ जानेवारी रोजी घरात कुणीही नसतांना त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. हा प्रकार शेजारचांच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीला आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

 

Exit mobile version