Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील देशमुखवाडी परिसरात रहिवासी असलेल्या महिलेने दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसल्याने घरच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील देशमुखवाडी परिसरातील रहिवासी अनिल पाटील यांच्या पत्नी सुनंदा अनिल पाटील (वय – ३२) यांनी दि. ९ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरातल्या छताला गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली. महिलेचे माम सासरे विजय अभिमन्यू पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी संगिता हिस तात्काळ रुग्णालयात दाखल केले. येथील ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांना त्यांना मृत घोषित केले. मयत संगिता अनिल पाटील यांनी आत्महत्या का केली ? यांचे कारण समजु शकले नाही.  घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे हे करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version