Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात विवाहितेची गळफास घेवून आत्महत्त्या

suicide PTI L 696x447

जळगाव प्रतिनिधी । मु.जे. महाविद्यालयामागे आश्विनी पार्कमध्ये एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, जागृती चेतन पाटील (वय-२४) हिचा विवाह चेतन पाटील यांच्यासोबत फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला होता. चेतन पाटील हे पोस्टात कामाला आहेत. २६ जुलै रोजी घरात कोणीही नसतांना जागृतीने दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वाजेच्या दरम्यान गळफास घेवून आत्महत्त्या केली. पोलिसांना तिने आत्महत्त्या करण्यापुर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. याबाबत वडील ईश्वर नामदेव पाटील रा. थेरोळा ता. रावेर यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय ठोंबरे करीत आहेत.

Exit mobile version