Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंजनसोंडे शिवारात उसाला आग

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शिवारातील शेतातील उसाला आग लागून सुमारे १ लाख १० हजाराचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रूपाली प्रमोद पाटील रा. अंजनसोंडे ता. भुसावळ याचे शेतात बाजूला असलेल्या शेतकरी कौशल संजीव शिंदे  रा. फुलगाव ता. भुसावळ याचे शेत आहे. कौशले ५ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतातील बंधावरल गवत पेटवून दिले. त्याच्या निष्काळजीपणामुळे रूपाली पाटील यांच्या शेतातील उसाला आग लागली. या आगीत उस आणि ठिंबक नळ्या जळून खाक झाले आहे. याप्रकरणी रूपाली पाटील यांच्या फिर्यादीवरून कौशल शिंदे याच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मधुकर भालशंकर करीत आहे.

 

Exit mobile version