साखर कारखानदारांना इथेनॉलचे आमिष देत खिंडार पाडण्याची शक्यता- प्रकाश आंबेडकर

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा| राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत नसून राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा अशी आहे, आणि राष्ट्रवादीतील साखर कारखानदारांना इथेनॉलचे आमिष दाखवत खिंडार पडण्याचीच दाट शक्यता भाजपकडून असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राज्यसभा निवडणुकीत सातव्या उमेदवाराने माघार घेतली नसल्याने या निवडणुकीत चुरस वाढली असून यात नेमका फायदा आणि फटका कोणाला बसणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपचा एक उमेदवार पश्चिम महाराष्टातील असून साखर कारखानदार आहे. या माध्यमातून तेथील राष्ट्रवादीच्या कारखानदारांना इथेनॉलचे आमिष दाखवत राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात खिंडार पडण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा अशी लढत नसून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीच आहे. आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार आहे. यातून राष्ट्रवादीला स्वताचा गड राखण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थिती निवडून आणावे लागेल अन्यथा भाजप पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या गडात शिरणार असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Protected Content