Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अस्थिरोग तज्ञांद्वारे अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । एक ४२ वर्षीय व्यक्‍ती उंचावरुन पडल्याने त्याला अवघड जागी फ्रॅक्‍चर झाले, त्या अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवर केवळ डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग तज्ञांद्वारे क्‍लिष्ट अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एका ४२ वर्षीय पुरुष रुग्णाला खुब्याच्या वाटीच्या हाडाचं फ्रॅक्‍चरवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हा रुग्ण अनेक खाजगी हॉस्पीटल मध्ये गेला मात्र त्याला कुठेच दाखल करुन घेण्यात आले नाही, मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात त्याला तात्काळ दाखल करुन घेतले. त्याच्या अपघाताची माहिती तज्ञांनी जाणून घेतली आणि सीटी स्कॅन करण्यास सांगितले. यात त्याला खुब्याच्या वाटीच्या हाडाला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.

पहिल्या टप्पयात ट्रॅक्शनची मदत

अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुनित वेलणकर, इंटर्न डॉक्टर्स यांनी रुग्णाच्या पायाला वजन बांधले. यामुळे रुग्णाच्या वेदना कमी झाल्या आणि फ्रॅक्‍चर झालेले हाड मुळजागी बसण्यास मदत झाली. सात ते आठ दिवस ही उपचार पद्धती अवलंबली.

स्क्रू, प्लेट्सच्या सहाय्याने फिक्सेशन 

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरवरची शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड यांनी केली असून त्यांना रेसिडेंट डॉ.सुनित वेलणकर, डॉ.राहूल जनबंधू, भुलरोग तज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले. स्कू्र आणि प्लेट्सच्या सहाय्याने फिक्सेशन करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर तीन ते चार दिवसांनी रुग्ण पायाची हालचाल करु शकला.

कठीण, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया शक्य 

अ‍ॅसिटाबुलम फ्रॅक्‍चरसह अन्य कठीण व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेंसाठी मेट्रो सिटीत जाण्याची गरज आता राहीली नाही. कारण या शस्त्रक्रिया आपल्या येथे करणेही शक्य आहे आणि त्या देखील योजनेंतर्गत मोफत केल्या जातात, याचा रुग्णांनी लाभ घ्यावा.

 

Exit mobile version