Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिव्या भोसले यांच्या प्रयत्नाला यश : आमडदे येथे लसीकरण केंद्र

भडगाव, प्रतिनिधी  । कोरोना बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्व आता नागरिकांना पटले आहे अर्थात लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे.  पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या आमडदे आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली व अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.

 

पिंपरखेड आरोग्य केंद्रास १० कि.मी.वर जाण्यासाठी ग्रामस्थांना नाहक ञास होत असल्याने आमडदे उपकेंद्रात लसीकरण सुरू करून आबाल वयोवृध्दांची हेळसांड होऊ नये ही बाब लक्षात घेऊन आमडदे उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली व अखेर लसीकरण सुरू झाले. लसीकरणासाठी लसीचे डोस आमडदे आरोग्य केंद्रास वितरीत करण्यात आले व लसीकरणास प्रारंभ झाला व शासनाने दिलेल्या नियमावली सकाळी सुरू झाले.ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकीय अधिकारी डाॅ.प्रतिक भोसले,आरोग्य सेवक सी.डी.पाटील आरोग्य सेविका सुरेखा पाटील,मदतनीस शितल पाटील,प्रतिभा पाटील,सविता पाटील या सर्व कर्मचारी यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version