Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुध्दीबळ स्पर्धेत तन्मय पाटीलचे यश

धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील इंदीरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी तन्मय अनिल पाटील याने जळगाव येथील कांताई सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत विजयी झाला असून विभागीयस्तरीय स्पर्धेत प्रवेश केला आहे.

त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे सचिव सी.के. पाटील, वं मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. या स्पर्धेसाठी तन्मय याला क्रीडाशिक्षक डी.एन. पाटील व फिलिप गावित यांनी मार्गदर्शन केले.

तन्मय हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थी असून त्याच्या या यशाबद्दल चेअरमन डी.जी. पाटील, संस्थेचे सचिव सी. के. पाटील, संचालक मच्छिंद्र पाटील, संचालक भरत पाटील, अश्विन पाटील, मुख्याध्यापिका सौ सुरेखा पाटील, पर्यवेक्षक ए एस पाटील मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Exit mobile version