Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात पेरीप्रोस्थेटीक फ्रॅक्‍चरची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात एका ३५ वर्षीय रुग्णावर पेरीप्रोस्थेटीक फ्रॅक्‍चरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तज्ञांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाली आहे.

३५ वर्षीय मिथुन बागुळकर ह्या रुग्णाला तीन महिन्यापूर्वी पायाच्या हाडाला गुडघ्याखाली फ्रॅक्‍चर झाले होते. एका खाजगी हॉस्पीटलमध्ये रॉड आणि स्क्रू टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतरही पायावर सूज कायम होती, दोन महिन्यानंतर रुग्ण कामावर गेला असता पहिल्याच दिवशी पुन्हा पडला आणि त्याच जागेवर मार लागून मोठे फ्रॅक्‍चर झाले. तसेच आधीचा जुना रॉड व स्क्रू जागेवरुन हलल्याने रुग्ण वेदनेने विव्हळत होता. खाजगी रुग्णालयात कोणीही रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नातेवाईक घेऊन आले असता तात्काळ त्याला दाखल करुन घेण्यात आले.

शस्त्रक्रियेचे दोन टप्पे 

अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रमोद सर्कलवाड, रेसिडेंट डॉ.सुनित वेलणकर यांनी रुग्णाला पाहिले तसेच एक्स रे काढण्यास सांगितले. त्यावरुन योग्य निदान झाले आणि लगेचच शस्त्रक्रियेच निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया खुप जिकरिची व गुंतागुंतीची होती. या शस्त्रक्रियेचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात जुना रॉड व तुटलेले स्क्रू बाहेर काढण्यात आले आणि दुसर्‍या टप्प्यात उच्च प्रतीचा रॉड व स्क्रू बसविण्यात आले. ही पेरीप्रोस्थेटीक फ्रॅक्‍चरची शस्त्रक्रिया तब्बल दोन तास चालली. अस्थिरोग तज्ञ डॉ.सर्कलवाड, डॉ.वेलणकर यांच्यासह भुलतज्ञांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

पुर्नशस्त्रक्रियेचे धोके 

तीन महिन्यानंतर पुन्हा पडल्याने रुग्णावर दुसर्‍यांदा शस्त्रक्रियेची वेळ आली. अन्य डॉक्टरांनी या नकार दिले, कारण यात खुप धोके होते. जसे की, जुने रॉड आणि स्कू्रमुळे हाडे ठिसुळ झाली असतात, जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते म्हणून सहसा पुर्न शस्त्रक्रिया करणे ही बाब जोखमीची मानली जाते.

मोठ्या शहरातील शस्त्रक्रिया येथेच शक्य

रुग्णाच्या पायाच्या हाडाला गुडघ्याच्या खालील भागात ३ महिन्यांपूर्वी फ्रॅक्चर झाले होते आणि बाहेरच्या खाजगी रुग्णालयात रॉड व स्क्रू टाकला होता. त्याजागी परत फ्रॅक्चर झाले आणि तो रॉड व स्क्रू जागेवरून हलले. अशा प्रकारच्या फ्रॅक्चर ला पेरी-प्रोस्थेटीक फ्रॅक्चर ( झएठखझठजडढकएढखउ ऋठअउढणठए) असे म्हणतात. अशा फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया ही जिकिरीची व गुंतागुंतीची असते. जुना रॉड व स्क्रू काढून हाड जागेवर आणून तिथे नवीन उच्च प्रतीचा रॉड टाकावा लागतो. सहसा आपल्याकडील रुग्णांना अशा शस्त्रक्रियेसाठी मुंबई / पुण्याला जाण्या शिवाय पर्याय नसतो. पण डॉ उल्हास पाटील रुग्णालयात या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नियमितपणे महात्मा फुले योजने अंतर्गत अगदी मोफत करून आम्ही देतो.

– डॉ.प्रमोद सरकलवाड -एमबीबीएस एमएस (ऑर्थो – सायन, मुंबई)

अस्थिरोेग तज्ञ/कृत्रिम सांधेरोपण/मणका तज्ञ योग्य उपचाराने बरा झालो.

तीन महिन्यापूर्वी खाजगी दवाखान्यात फ्रॅक्‍चरनंतर शस्त्रक्रिया झाली. मात्र माझा पाय वाकडाच पडत होता. मी कामावरु रुजु झालो त्यादिवशी पाय वाकडा पडल्यानेच मी पुन्हा पडलो आणि आता माझ्यावर येथे शस्त्रक्रिया झाली. आता माझा पाय मला पूर्णपणे हलवता येत असून सरळ झाल्याचे जाणवत आहे. हे सर्व डॉक्टरांच्या उपचाराने शक्य झाले.

Exit mobile version