पाचोऱ्यात राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या आमरण उपोषणाला यश

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पुतळा (स्मारक) नियोजित जागेवर होण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, समता सैनिक दल आणि इतर संघटनेतर्फे आमरण उपोषण सुरु होते. मात्र आज उपोषणाची माजी आ.दिलीप वाघ यांनी दखल घेतल्याने उपोषण थांबविण्यात आले आहे.

गेल्या २० ते २५ वर्षापासून प्रलंबीत असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्याच्या मुद्यावरुन पाचोरा शहरात गेल्या तीन दिवसापासून राष्ट्रीय ओ. बी. सी. मोर्चा व समता सैनिक दल आणि पाचोरा शहरातील सर्व पुरोगामी, राजकीय, सामाजिक, सहयोगी संघटनेच्या वतीने उपोषणाचा पवित्रा हाती घेतला होता. त्याची प्रमुख जबाबदारी राष्ट्रीय ओ. बी. सी. मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, माजी नगरसेवक अशोक मोरे, समता सैनिक दलाचे जिल्हाउपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते किशोर डोंगरे यांनी हाती घेतली होती. उपोषणाची तीव्रता वाढू लागल्याचे लक्षात येताच माजी आमदार दिलीप वाघ यांनी दखल घेत आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून उपोषण सोडावे असे सुचवले.

उपोषण स्थळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा नगरपालिकेचे माजी गटनेते संजय वाघ, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, मा. उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी दखल घेत प्रशासन व उपोषणकर्त्यांची भूमिका व मागणी लक्षात घेता शेवटी न. पा. प्रशासनाने मागणी मंजूर करत उपोषण मागे घ्यावे व पुतळा (स्मारक) संदर्भात एन. ओ. सी., ठराव, जागेचा उतारा, पी. डब्लू. डी. ला दिलेल्या इस्टीमेटसाठीचे पत्र इत्यादी महत्त्वाचे कागदपत्रे देत व उपस्थितांच्या मध्यस्तीने उपोषणाची सांगता करण्यात आली.

न. पा. मुख्यकार्यकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, प्रा. गणेश पाटील, सुरेश देवरे, हारुन देशमुख, बशीर बागवान, हरीभाऊ पाटील, अॅड. अण्णासाहेब भोईटे, भरत खंडेवाल, कन्हैया देवरे, नंदू सोनार, नितीन संघवी, पप्पू राजपुत, दिपक अदिवाल, अझहर मोतीवाला, मतीन बागवान, योगेश महाजन, मच्छिंद्र जाधव, विलास पाटील (बामसेफ), माजी नगरसेवक विकास पाटील, किशोर बारवकर, भालचंद्र ब्राम्हणे, खंडू सोनवणे, शशी मोरे, सतीष देशमुख, नंदलाल आगारे आदि उपस्थित होते. व सदर उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार किशोर डोंगरे यांनी मानले.

सर्वानूमते उपोषण सोडण्यात येत असल्याचे जाहीर केले. या उपोषणाला समता परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शिवस्वराज्य युवा फाउंडेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पाचोरा), युवक काँग्रेस (पाचोरा), राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, पी. आर. पी. व इतर अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.

 

 

 

Protected Content