Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हिंदी भाषा सामान्यज्ञान स्पर्धेत यश

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी सप्ताहानिमित्ताने हिंदी विभागाच्यावतीने हिंदी भाषा सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन करण्यात आले असून अश्विनी परदेशी हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.

यात जळगाव जिल्ह्यातुन एकुण ८७ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेत अश्विनी परदेशी (एसवाय बी.कॉम ) हिने प्रथम क्रमांक  पटकावला तर द्वितीय क्रमांक जीवन कोळी( टीवाय बी ए) व तृतीय क्रमांक सुधांशू पाटील (एसवाय बी.कॉम ) यांनी मिळवला आहे. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली  हिंदी विभाग प्रमुख डॉ. पी. व्ही .पावरा यांनी सदरच्या स्पर्धा घेण्यात आल्यात. सदरच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी महत्वाचे परिश्रम घेतले. या यशस्वी स्पर्धत यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांचे उपप्राचार्य प्रा.ए .पी .पाटील ,प्रा. एम .डी. खैरनार व प्रा. संजय पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

Exit mobile version