Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुयारी गटारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ; तात्काळ चौकशीची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेल्या भुयारी गटाराचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जात संबधित ठेकेदाराने केल्याचे लेखी निवेदन रिपाइंचे (आठवले गट) अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष राजू तडवी यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, कामाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना दिलेल्या निवेदनात राजु रमजान तडवी यांनी म्हटले आहे की , मारूळ तालुका यावल येथील ग्रामपंचायती अंतर्गत गावात भुमिगत गटारींचे काम हे शासनाने ठरवुन दिलेल्या अंदाजपत्राकानुसार करण्यात आलेले नसुन ठेकेदाराच्या माध्यमातुन गावातील जुन्याच गटारींवर नवे बांधकाम दाखवण्यात येणार असल्याचे गोंधळ सद्या सुरु आहे . यामुळे ज्या उद्देशाने शासनाच्या लाखो खर्चाच्या निधीतुन मारूळ बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर भुमिगत गटारींचे काम होणे अपेक्षीत होते मात्र तसे होतांना दिसत नाही . तरी या सर्व निकृष्ठ व बोगस गटारींच्या कामांची तात्काळ चौकशी करण्यात येवुन संबधीत ठेकदाराकडुन योग्य प्रकारे व गुणवत्तापुर्ण करून घ्यावे तसेच संबधीत ठेकेदार जो पर्यंत शासकीय अंदाज पत्राकानुसार भुमिगत गटारींचे काम करीत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवु नये , पंचायत समितीच्या वारिष्ठांकडुन जर या कामांची चौकशी होवुन कार्यवाही न झाल्यास रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट )च्या माध्यमातुन यावल पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात येईल असे म्हटले आहे यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सरवर तडवी यांनी निवेदन स्विकारले

Exit mobile version