Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करुन अहवाल सादर करा – डॉ. विक्रम बांदल

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहशिलदार कैलास चावडे, तलाठी आर. डी. पाटील आणि राजश्री पेंढारकर यांनी पाहणी केली असून नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करुन तातडीने अहवाल सादर करा, अशा सूचना डॉ. विक्रम बांदल यांनी यावेळी दिली आहे.

पाचोरा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच एकुण ४१० तर सरासरी ५८.५७ मिलिमीटर पाऊस झाल्याने कुऱ्हाड सर्कलमधे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद होऊन उतावळी नदीला १५ वर्षांनंतर महापूर आल्याने खेडगाव (नंदिचे) गावातील एस. टी. स्टॅण्ड परीसरात पाणी घुसून ३० वराह, ४० कोंबड्या, २ शेळ्या, १ गाय, १ म्हैस व अनेक घरात पाणी शिरल्याने मजूर लोकांच्या घरातील अन्नधान्य,भांडे, टी. व्ही., कपडे वाहून गेले,तर पाचोरा शहरातील ५५ वर्षाच्या महिलेच्या अंगावर भिंत पडल्याने ती जागेवर ठार झाली. नेरी येतील गडद नदिपात्रातील के. टी. वेअरमधे २४ वर्षाचा युवक वाहून गेल्याची घटना घडली, घटनास्थळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहशिलदार कैलास चावडे, तलाठी आर. डी. पाटील, राजश्री पेंढारकर, यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच स्वाती कैलास कुमावत, उपसरपंच भटेसिंग पाटील, पोलीस पाटील उमा शेखर पाटील, सदस्य प्रदिप पाटील, संदिप संघवी, सरला भरत पाटील अभिमन बाविस्कर, कोतवाल गोपाळ प्रताप पाटील सह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

खेडगाव (नंदिचे) येथील उतावळी नदीला मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक पूर आल्याने केवळ ३० मिनीटतच होत्याचं नव्हतं झालं,यात नदिकाठच्या १५ ते ४० घरात पाणी शिरल्याने भिका वडर यांचे ३० वराह,रामा गुजर एक गाय,रायभान पाटील यांची एक म्हैस व तीचे पारडू, तर जुम्मा पिंजारी,रमजान पिंजारी,सरला कोळी,युरुफ पिंजारी,भिकन पिंजारी यांच्या ४० कोंबड्या व दत्तू ढमाले यांचे खळ्यातील गुरांचा चारा आणी अशनेकांचे भांडे,कपडे, धान्य व संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले असल्याने शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी विनंती उपस्थित नागरीकांनी उपविभागीय अधिकारी व तहशिलदार यांचेकडे केली आहे,नुकसानीचा पंचनामा तलाठी राजश्री पेंढारकर ह्या करीत असून संपर्क पंचनामे झाल्यानंतरच नुकसानीचे खरे आकडे बाहेर येणार आहे.

नदीत गाळ साचलेल्याने शिरले घरात पाणी

खेडगाव नंदिचे येथील उतावळी नदीला सन २००६ नंतर १५ वर्षांनी प्रथमच महापूर आला नदिपात्रात मोठ्या स्वरुपाचा गाळ साचलेला आहे याशिवाय गावापासून पुढील भागात मोठा के टि वेअर बांघलेला आहे या के टि वेअर वरुन मोठ्या स्वरुपाचा पूर आला तर पाणी पास होण्याची क्षमता नाही यामुळे पाणी मागे येवून गावात शिरले, उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल व तहशिलदार कैलास चावडे यांनी नदि कोरडी झाल्यावर गाळ काढण्याच्या सुचना ग्रामपंचायतीस दिल्या.

मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान उतावळी नदीला अचानक महापूर आला अवध्या तीस मिनिटांत घरांमधे पणी शिरुन घरातील साहित्य काढण्या व गुरे ढोरे सोडण्यास वेळ मिळाला नाही हेच तर रात्रीच्या वेळी पाणी शिरले असते तर अनेक जणांना पूरात समाधी घ्यावी लागली असती दिवसा पूर आला म्हणून आमचे प्राण वाचले साहेब,अशा पद्धतीने भावनिक शब्दात येथील वृध्द महिला ममता जुम्मा पिंजारी या महिलेने उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल यांचे कडे आप बिती हकीकत सांगितली.

ओझर, बांबरुड महादेवाचे येथे जावून नागरीकांना दिला सत्रर्कतेचा इशारा 

पाचोरा तालुक्यातील गिरणा नदिला महापूर सुरू असून उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल, तहशिलदार कैलास चावडे,तलाठी आर डी पाटील यांनी गिरणा नदिलगताच्या ओझर व बांबरुड महादेवाचे येथे जावून नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात दवंडी देण्याच्या सुचना दिल्या यावेळी ओझर येथील पोलीस पाटील सविता सुखदेव पाटील व सरपंचपती शरद पाटील सह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

 

Exit mobile version