दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा – समाज कल्याण विभागाचे आवाहन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन महाबळ येथील समाज कल्याण विभागाचे अधिकारी विजय रायसिंग यांनी आज प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारत सरकार सामाजिक न्याय व सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. दिव्यांग विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarship.gov.in ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विहित मुदत देण्यात आलेली आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आज शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले.

Protected Content