Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

vivekanand high school chopda

चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात नुकताच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात विद्यालयातील एकूण चौदा विद्यार्थ्यांना शहरी विभागातून शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जैनब जावेद तडवी जिल्ह्यात ५७ विद्यालय प्रथम,मोहिनी राहुल साळुंखे जिल्ह्यात ९५ विद्यालयात द्वितीय, तनिष पवन लाठी जिल्ह्यात १०२ विद्यालया तृतीय,यश किरण पाटील जिल्हयात १२० विद्यालयात चतुर्थ,सत्यम संजय सोनवणे जिल्ह्यात १२५ विद्यालयात पाचवा, लावण्या निलेश पाटील जिल्हयात १२६ विद्यालयात सहावी,अवनी अजित वानखेडे जिल्ह्यात १६३ विद्यालयात सातवी, पूर्वा मच्छींद्र पाटील जिल्ह्यात २०२ विद्यालयात आठवी,तन्मय तुषार माळी जिल्ह्यात २१३ विद्यालयात नववा,भूमिका अतुल चौधरी जिल्ह्यात २४९ विद्यालयात दहावी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी पारस दिलीप पाटील जिल्ह्यात २९ विद्यालयात पहिला भक्ती रवींद्र कुमार पाटील जिल्ह्यात ४३ विद्यालयात द्वितीय ललित केवलदास महाजन जिल्ह्यात १४२ तर विद्यालयात तृतीय आणि सृष्टी पुनमचंद जैन जिल्ह्यात १७० तर विद्यालयात चतुर्थ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपशिक्षिका राजेश्‍वरी भालेराव, नूतन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पोतदार संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल सचिव अ‍ॅड रवींद्र जैन ,मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद ,पालकवृंद व विद्यार्थी यांनी केले आहे.

Exit mobile version