Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्यांनो संवाद साधायला शिका – चंद्रकांत भंडारी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आठवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी शिकत असतांना स्वतःचे वेळापत्रक व्यवस्थितपने करत जर त्यानुसार सर्व विषयांच्या कृतीपत्रिका दिलेल्या गुणांनुसार सोडविल्या व स्वतःला प्रेरणा देत वर्षभर अभ्यास केला तर त्यांना निश्चित चांगलं यश मिळत, असा सल्ला केसीई सोसायटीचे शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

टिपण कशी काढायची ती वहीत व्यवस्थित लिहीत परीक्षा अगोदर त्यांची उजळणी कशी करायची हे विविध उदाहरणादाखल “मेने करके देखा मै समझ गया” हा मंत्र सांगून ग्रुप स्टेडिजचे महत्व सांगितले. या कार्यक्रमात 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी यशपयशाला थेट व धीटपणे सामोरे जात असतांना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या विषयी शाळेचे प्राचार्य डॉ. ब्रूस रेंडरसन यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी शाळेचे उपप्राचार्य चंद्रकला सिंग व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

 

Exit mobile version