Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कळमसरेत विद्यार्थ्यांने रक्तदान करुन साजरा केला वाढदिवस

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील कळमसरे येथील महाविद्यालयीन विद्यार्थी रक्तपेढीत रक्तदान करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत आहेत.

रक्तदान हेच जीवनदान; रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे नेहमी म्हटले जाते. मात्र, अलीकडे वाढदिवस म्हटलं की पैशांची उधळण, मात्र कळमसरे येथील महाविद्यालयीन प्रथमेश कैलास चौधरी हा युवा तरुण यास अपवाद ठरला आहे.राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुडवडा जाणवत असतो.यासाठी आरोग्य विभागा तर्फे दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येत असते. शिवाय युवकांनी रक्तदान करावे, यासाठी देखील विविध स्तरावर प्रयत्न केले जातात. नेमकी हीच सामाजिक गरज लक्षात घेवून व सकारात्मक विचार मनात ठेवून प्रथमेश गेल्या तीन वर्षांपासून रक्त  पेढीमध्ये जाऊन रक्तदान करून अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करीत आहे.

रक्तदान केल्याने कुणाचातरी जीवास जीवदान मिळत असेल तर यापेक्षा दुसरे पुण्य असूच शकत नाही,असे स्पष्ट केले. प्रथमेशने जन्मदिनाचे औचित्य साधत अमळनेर येथील रक्त चळवळीचे प्रणेते मनोज सिंगाणे यांचा उपस्थितीत जीवन श्री रक्तपेढीत जाऊन रक्तदान करून गावापुढे समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.

 

Exit mobile version