Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी नाना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थांची झुंबड

34859d75 f6ea 410c a72a b6229bcfd831

फैजपूर, प्रतिनिधी | येथील धनाजी नाना महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे येथे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थांची झुंबड उडाली आहे. परिसरात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ख्याती आहे.

 

१५ जून पासून कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधे प्रवेशाचे कामकाज महाविद्यालयात सुरू आहे. विद्यार्थांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी केले आहे. धनाजी नाना महाविद्यालयाची वैशिष्ट्ये म्हणजे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, प्रशस्त इमारती व सुसज्ज प्रयोग शाळा, ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत, स्वतंत्र वाचन कक्ष, प्रशस्त, क्रीडांगण,एन.एस.एस.एन.सी. सॉफ्टस्कील डेव्हलपमेंट, दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधिनी, स्पर्धांपरीक्षा अभ्यासकेंद्र, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा, समुपदेशन केंद्र, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय, कँन्टीन, ग्राहक भांडार, संशोधन सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयात नाविन्यपूर्ण १६ सर्टिफिकेट कोर्सही उपलब्ध आहेत. तसेच महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे बी.सी.ए, एम.सी.ए., एम.बी.ए. हे व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. प्रवेशासंदर्भात काही अडचण असल्यास प्रवेश समिती प्रमुख प्रा.आर.पी. झोपे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय व्यवस्थापनाने केले आहे.

Exit mobile version