Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वप्नील शिंपींचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा; शिंपी समाजाची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । हवाल्याचे १५ लाख रूपये घेवून कारने जाणाऱ्या स्वप्निल रत्नाकर शिंपी (वय २९, रा. फरकांडे, ता. एरंडोल) या तरूणाचा २६ नोव्हेंबर रोजी पैश्यांसाठी चाकूहल्ला झालेला नसून कट कारस्थानातून मित्र दिलीप चौधरी यानेच खून केला असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज व मयत स्वप्निलचे नातेवाईकांनी केली आहे. बळीराम पेठेतील पत्रकार भवनात रविवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत नातेवाईकांनी आरोप केला आहे.

 

याबाबत  अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रबाबा बागुल यांनी सांगितले की, दिलीप राजेंद्र चौधरी रा. फरकांडे ता. एरंडोल जि. जळगाव याने स्वप्निलची कट रचून हत्या करण्यात आली आहे. असा आरोप मयत स्वप्निलच्या नातेवाईकांनी केला आहे. हल्ला झाल्यानंतर मयतच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने या घटनेचा कसून चौकशी करावा आणि कोणातीही राजकीय व सामाजिक याचा दबाव न आणता मारेकऱ्यांवर भादवि कलम ३०२ लावावा अशी मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करून मारेकऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

बागुल पुढे म्हणाले की, मयत स्वप्निलच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली. यावेळी कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली असता हा पैश्यांसाठी हल्ला नसून सोबत असलेला दिलीप राजेंद्र चौधरी याने कट रचून हा खून करण्यात आला आहे.  मयताच्या पश्चात तीन वर्षाची मुलगी, पत्नी गर्भवती, आई वडील असा परिवार असल्याचे बागुल यांनी सांगितले. दरम्यान या हल्ल्यात दिलीप चौधरी याला कुठलीही दुखापत झालेली नसून त्याच्या प्रतिक्रियावरून मयत स्वप्निल विषयी कोणतीही सहानुभूती दिसून आली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस प्रशासनाकडे करणार असल्याचेही बागुल सांगितले.

 

अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रबाबा बागुल , मयत स्वप्नीलचे वडील रत्नाकर खैरनार, संजय खैरनार, मनोज भंडारकर, राजेंद्र सोनवणे, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कापूरे, संजय जगताप, शिवाजी शिंपी, जयंत कन्नडकर, रत्नाकर शिंपी, सुरेश सोनवणे, अनिल खैरनार,  युवाध्यक्ष प्रमोद शिंपी, राजेश खैरनार, दिलीप भांडारकर, सुरेश कापुरे, बंडूनाना शिंपी, संजय इसई, अनिल मांडगे, मनोज जगदाळे आदी उपस्थित होते.  यांच्यासह शिंपी समाज बांधव  उपस्थित होते.

 

Exit mobile version