Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा करा; भीम आर्मीची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशा मागणीचे निवेदन यावल तालुका भीम आर्मीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

या संदर्भात भिमआर्मीच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दि.२ फेब्रुवारी २०२२ रोजी पाशवी बलात्कार करून तिचा निर्दयीपणे खुन करण्यात आला. पोलीसांनी घटनेचे गांर्भीय लक्षात घेत तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करीत जाब जवाबाच्या आधारे गावातील संशयित आरोपीस अटक केली आहे.

सदर या अल्पवयीन मुलीची हत्या नसुन आत्महत्या केल्याचे पोलीसांनी गुन्ह्यात नमूद करण्यात आल्याचे आरोप पिडीत मुलीच्या कुटुंबाने केला आहे. ही हत्या नसल्याचा बनाव करीत या गुन्ह्यातील दोन संशयीत आरोपींवर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप पिडीत कुटुंबांनी केला आहे. एकंदरीत पाहता सदरच्या या अत्यंत निंदनिय अशा घटनेतील पोलीस प्रशासनाच्या वतीने दबाव तंत्राचा वापर करून घटना दाबण्याचा प्रकार होत असुन, पोलीसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून त्या दोन संशयीत आरोपींना अटक करावी आणि कठोर शिक्षा करावी. तसेच पिडीत अल्पवयीन मुलीच्या कुंटुबास न्याय मिळवुन द्यावा अशी मागणी केली. या मागणीचे भिमआर्मीचे तालुका अध्यक्ष प्रविण डांबरे , तालुका उपाध्यक्ष सचिन पारधे , यावल शहराध्यक्ष बबलु गजरे , जिल्हा संघटक हेमराज तायडे , राहुल जयकर आणि जितेन्द्र गायकवाड यांनी निवेदना दिले आहे.

Exit mobile version