Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काशी एक्सप्रेसखाली सापडुन अनोळखी व्यक्तीचा मृत्यु

Railway news

रावेर, प्रतिनिधी | डाउन काशी एक्सप्रेसखाली सापडल्याने कापला जाऊन एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना आज सोमवारी वाघोडा स्टेशन जवळील लोखंडी पुलाजवळ घडली. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाघोडा रेल्वे स्टेशन नजिक कि.मी.४८८/३१/३२ जवळ एक अनोळखी व्यक्ती दुपारी २.५० रेल्वे रुळ ओलांडून जात होता. डाउन काशी एक्सप्रेसखाली सापडून तो मरण पावला आहे. त्या अनोळखी पुरुषाचे अंदाजे वय ५० ते ५५ असावे. त्याचा रंग सावळा आहे. अंगात पांढरा शर्ट ग्रे रंगाची फुल पँट त्याचे असे वर्णन आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केली आहे. याबाबत भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हे. कॉ.त्र्यंबक वाघ ,कॉ .नरेंद्र लोढे हे पुढील तपास करीत आहे.

Exit mobile version