Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामठी येथील अवैध दारू विक्री थांबवा ; ग्रामस्थांची मागणी

WhatsApp Image 2019 11 03 at 5.04.44 PM

जामठी ता.बोदवड, प्रतिनिधी | बोदवड तालुक्यातील जामठी येथील ग्रामस्थांतर्फे अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या संदर्भात बोदवड पोलिस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.

जामठी येथील ग्रामस्थांनी चार ही रस्त्यावरील व गावत अनेक ठीकाणी अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय असल्याचा आरोप निवेदनाद्वारे केला आहे. गावात अवैध दारू विक्री होत असून दारूच्या व्यसनाने बरेचसे संसार उध्वस्त होत आहे. गरीब लोक व्यसनाधीन होत आहे. परिसरात दारूविक्रीमुळे कुटुंबातील कर्त पुरूषांच्या म्रुत्यु झाल्यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होते आहे. यामुळे परीसरात अवैध दारू विक्री करण्याऱ्यांवर कार्यवाही करून अवैध दारूचे धंदे बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास लोकशाही पध्दतीने अंदोलन करण्यात येईल असा इशारा जामठी येथील ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर जामठी गावातील लोकांच्या सह्या करून त्यानिवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक जळगाव ,आमदार चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव, तहसीलदार बोदवड यांना देण्यात आले आहे.

Exit mobile version