Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आरोग्य विभाग यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा – खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी ।  आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करा असे आदेश खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची फिरफिर हि सुरू आहे. त्यात शहरातील ट्रामा केअर सेंटरला जाऊन पुन्हा आंधशाळेत जावा लागत असल्याने सर्वसामान्य जनतेचा हेळसांड होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा असे आवाहन खा. उन्मेष पाटील यांनी आज आयोजित तहसील कार्यालयात आढावा बैठकीत केला. होम कॉरंटाईन रुग्णांची तपासणी काळजीपूर्वक होत नसल्याने कोरोना रुग्ण इतरांना “प्रसाद” वाटतो  आहे. हि वस्तूस्थिती आहे. त्यामुळे गावासहीत ठिकठिकाणी फलक लावून जनतेला दिलासा द्या असेही खा. उन्मेष पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच आज एकूण ३०० रूग्णांची नोंद झाली आहे. ते स्प्रेडर होत असुन ही बाब प्रशासनाने गंभीर घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

यावेळी खा. उन्मेष पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर , तहसीलदार अमोल मोरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण,  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, शैलजा मेमोरिअल हॉस्पिटल संचालक डॉ. मंगेश वाडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, ग्रामीण रूग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ.मंदार करंबळेकर, पालिका ओ. एस. श्रीमती फडतरे, सहाय्यक गट विकास अधिकारी पवार, डी डी शिर्के, नगरसेवक नितिन पाटील, विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version