Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मविप्र प्रकरण : जयवंत भोईटे यांच्या घरावर मध्यरात्री दगडफेक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या गैरव्यवहार संदर्भात संचालक सदस्य जयवंत भाईटे यांनी उच्च न्यायालयात तक्रार केल्याचा रागातून मानद सचिव निलेश भोईटे यांनी जयवंत भाईटे यांच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीला आली. यासंदर्भात तालुका पोलीसात तक्रार दाखल न केल्याने जयवंत भोईटे यांनी संबंधित व्यक्तीवर करवाई करण्याची मागणी ऑनलाईन तक्रारीद्वारे पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांना केली आहे.

जयवंत बाबुराव भाईटे रा. विठ्ठल पार्क, मुक्ताईनगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव या संस्थेचा संचालक असून या संस्थेत मानद सचिव असलेल्या नीलेश भोईटे याने केलेल्या गैर कारभार बाबत उच्च न्यायालय तसेच शासनाच्या अनेक विभागांकडे तक्रारी केलेल्या आहे. त्यातून नीलेश भोईटे व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी  अनेक वेळा मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याबाबत मी आपल्या पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दिल्या आहे. परंतु आज २४ मे २०२१ रोजी मध्यरात्री दोन वाजता नीलेश भोईटे याने रात्री १.४५ वाजता त्याचा गुंड हस्तक कल्पेश भोईटे याला इतर दोन गुंड देऊन माझ्या घरावर जीवघेणा हल्ला केला. यात कल्पेश भोईटे याने मोठ मोठे दगड माझ्या परिवारातील लोकांवर भिरकवले. त्यातील दोन ते तीन दगड महिला व लहान मुले बाल बाल बचावले. त्यानंतर कल्पेश भोईटे याने घराच्या कंपाऊंडमध्ये उडी मारत तुटलेल्या खिडकीतून अश्लील शिवीगाळ केली आणि धमकी दिली की “नीलेशभाऊच्या विरोधात आडवा येतो का? जया हा फक्त ट्रेलर असून आठवडा भरात नीलेशभाऊ तुला व तुझ्या परिवाराला जिवंत ठेवणार नाही. जया बाहेर निघ तुला आताच संपवतो.” परंतु शेजारील नागरीक बाहेर आल्यामुळे आल्याने कल्पेश आणि त्याच्या सोबत आलेले गुंड पळून गेले. 

जयवंत यांच्यासह परिवाराला जिवीताला धोका असून निलेश भोईटे, कल्पेश भोईटेसह इतर साथिदार गुंडांवर गुन्हा दाखल करावी अशी मागणी जयवंत भोईटे यांनी पोलीस अधिक्षक मुंढे यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Exit mobile version