Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्जमाफीबद्दल अद्याप राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया

indian farmer

नागपूर, वृत्तसंस्था | महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारच्या या घोषणेनंतर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. तर, सात बारा कोरा झाला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी म्हटले की, या कर्जमाफीमुळे सात बारा कोरा करण्याचा शब्द पुर्ण होत नाही. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे थकीत असणा-या शेतकर्यांना थोडाफार लाभ मिळेल. पण महापूर, अतिवृष्टी यामुळे जे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या पिकांना नुकसान भरपाईही नाही आणि कर्जाची मुदत जून २०२० पर्यंत असल्यामुळे ते थकीत नाहीत म्हणून त्यांच्या पदरात काहीच पडणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले.

कृषी अभ्यासक आणि शिवसेनेचे किशोर तिवारी यांनी राज्य सरकारच्या घोषणेचे स्वागत केले. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार आणखी पावले नक्कीच उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version