Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

. . .अजून तर दुसरे घोटाळे बाकी ! : किरीट सोमय्या

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत आत गेले असले तरी आता युनिटेक घोटाळ्यासह अन्य प्रकरणे बाकी असून याचेही परिणाम राऊत यांना भोगावेच लागणार असल्याचा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

काल तब्बल १५ तासांपेक्षा जास्त चौकशी झाल्यानंतर रात्री पाऊण वाजेच्या सुमारास ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना अटक केल्याचे जाहीर केले. त्यांची काल सकाळपासून चौकशी सुरू होतांनाच राऊत यांच्या विरूध्द झुंज देणारे सोमय्या यांनी कालच त्यांच्यावर टीका केली होती. आज सकाळी त्यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे.

आज टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना किरीट सोमय्या म्हणाले की, पत्रा चाळ घोटाळ्यात राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. याशिवाय आधीच युनिटेक घोटाळ्याची चौकशी सुरू असून यात ते अडकणार आहेच. सोबत त्यांच्या विदेशवार्‍यांची चौकशी सुध्दा होणार आहे. चीन, दुबई आदी ठिकाणी त्यांनी केलेल्या फेर्‍या कशासाठी होत्या ? यात त्यांना कोण भेटले ? याची माहिती समोर आल्यावर राऊत अडचणीत येतील असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला.

Exit mobile version