राज्यांना मिळणार २० हजार कोटी रुपये – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । आज झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यांना आज रात्री उशिरापर्यंत २० हजार कोटी रुपये जीएसटी दिला जाईल.

आज झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यांना आज रात्री उशिरापर्यंत २० हजार कोटी रुपये जीएसटी दिला जाईल. केंद्र सरकारला कम्पेनसेशव सेसच्या माध्यमातून मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांच्या जीएसटीचे वितरण राज्यांमध्ये केले जाईल.

या बैठकीमध्ये केंद्र सरकारने मांडलेल्या प्रस्तावाला २० राज्यांनी सहमती दर्शवली. मात्र काही राज्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे या बैठकीत जीएसटीच्या वाटपाचा मुद्दा सुटू शकला नाही. आता यापुढच्या बैठकीमध्ये न सुटलेल्या मुद्द्यावर चर्चा होईल.

निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत निधी हा उधार उसनवार करून गोळा करावा लागेल. याबाबत बिहारचे वित्तमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी उधार घेण्याच्या पर्यायाबाबत सर्वांनी पुन्हा एकदा भेटून बोलले पाहिजे. यासाठी सर्व सदस्य १२ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा भेटतील आणि या समस्येवर चर्चा करतील.

 

 

 

Protected Content