Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विविध मागण्यांसाठी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ओबीसींची स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघ जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, “सुप्रीम कोर्टाने निर्णयामुळे ओबीसी वर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण स्थगित झालेले असून यापूर्वी १०५ नगरपंचायत आणि अकोला, वाशिम, भंडारा, पालघर, नंदुरबार आणि नागपूर या जिल्हा परिषद मधील पोटनिवडणुका काही ओबीसी आरक्षणाशिवाय झालं. या प्रवर्गावर अन्याय झाला आहे. घटनेच्या ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीने आरक्षण मिळालं होतं. तरीही कोर्टात योग्य मांडणी केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारकडून झाले नाही असे म्हणत या पुढील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत” अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवडणुका झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनात देण्यात आला.

केंद्रीय रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबद्दल अपमानकारक शब्द वापरल्याबद्दल ओबीसी सह बाला बारा बलुतेदार समाज जाहीर निषेध करत असून पंतप्रधान यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या –

१ ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येऊ नये.
२ बाराबलुतेदार समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्यात यावे.
३ एसबीसी समाजाचे आरक्षण ५० टक्केच्या आत बसवावे.
४ महाज्योती या संस्थेला लोकसंख्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.

निवेदनावर सखाराम मोरे, ईश्वर मोरे, भास्कर जुनागडे, अलका सोनवणे, देविदास फुलारे, मुकुंद सपकाळे, पुनम खैरनार, आरती शिंपी, रवींद्र शिंपी, किशोर निकम, सुरेश पारस्कर, रमेश बोरसे, तुळशीराम बोरसे, गणेश शिरसाट, शामकांत निकम, अनिल खैरनार, राजेंद्र सोनवणे, मीनाक्षी जावळे, मंजू देवरे, वसंत पाटील, विकास कुंभार, योगेश वाघ, छाया कोरडे, तुकाराम बारेला, पवन सिल्लोडकर यासह महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्ष भारती कुमावत, विभागीय अध्यक्ष मुकूंद मेटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

व्हिडीओ लिंक

https://fb.watch/bByhBMNwTY/

 

Exit mobile version