Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कजगाव येथील जैन फाऊंडेशनचे विविध मागण्यांचे खासदार पाटील यांना निवेदन

कजगाव प्रतिनिधी । राजस्थानमधील अनुप मंडल संस्था जैन समाज विरूध्द प्रचार करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन श्री.वर्धमान सकल जैन फाउंडेशनच्या वतीने खासदार उन्मेश पाटील देण्यात आले.

श्री.वर्धमान सकल जैन फाउंडेशनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजस्थानमधील अनुप मंडल संस्था जैन समाज विरुद्ध काही दृष्ट प्रचार करत आहे. जैन साधू संत विरुद्ध काही प्रवृत्ती सात्यत्याने दुष: प्रचार करत आहे. त्यांच्या विरुद्ध शासनाने तातडीने कारवाई करावी. या मागणीसाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ कजगाव व श्री वर्धमान सकल जैन फाउंडेशनचे सदस्यांनी खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी, जैन श्रावक संघ, कजगाव अध्यक्ष चेतन धाडिवाल, श्री वर्धमान सकल जैन फाउंडेशन कजगाव अध्यक्ष वर्धमान चोरडिया, नवयुवक मंडळ सदस्य दिलीप जैन, निरज धाडीवाल, हर्षल बोरा, उमेश बोरा, अंकुश धाडिवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version