Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली ग्रामपंचायतीला ग्रामसेवक मिळण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचा ग्रामसेवक मिळावा या मागणीचे निवेदन सरपंच विलास अडकमोल यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्याकडे दिले आहे.

लोकप्रतिनिधींना जर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामसेवक मिळत नसेल तर आम्ही काय करावे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला . दरम्यान कोरपावली तालुका यावल ग्राम पंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांनी ग्रामपंचायतीच्या गोंधळलेल्या कारभारामुळे तात्काळ बदली करण्यात आली असुन , प्रविण सपकाळे यांच्या बदलीच्या जवळपास दोन महीन्यानंतर ही कोरपावली ग्रामपंचायतीला अद्याप कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने सरपंच , उपसरपंच व त्यांच्या सहकार्यांना गावपातळीवर विकासकामे करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान या संदर्भात आज कोरपावली ग्रामपंचायतीचे सरपंच विलासा नारायण अडकमोल यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश शांताराम पाटील यांची भेट घेवुन आपल्या ग्रामपंचायतीला कायम गावाग्रामसेवक नसल्याने गावाच्या विविध विकास कामे करण्यात येत नसल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर गावातील ग्रामस्थ मंडळी कडुन नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची माहीती त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिली , यासंदर्भात आपण दोन दिवसा निर्णय घेवु असे आश्वासन याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दिले असुन , या संदर्भात काही ग्रामसेवकांच्या कार्यपद्धती बद्दल तक्रारी देखील असुन आपण अशा बेशीस्त वागणाऱ्या ग्रामसेवकांना आपल्या पध्दतीने शिस्त लावणार असल्याचे सांगुन काही ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच पंचायत समिती स्तरावर सहा ग्रामविकास अधिकारी आणी चार ग्रामसेवकांच्या जागा या अद्याप ही आपल्याकडे रिक्त असल्याच्या त्यांनी सांगीतले.

Exit mobile version