Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल कोरपावली रस्ता दुरुस्तीसह हडकाई नदीवर पूल बांधण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी । यावल ते कोरपावली या जुन्या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची गरज आहे. तसेच याच रस्त्यावर हडकाई नदीवर पूल बांधावा. यासाठी यावल तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक सरवर तडवी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोरपावली ते यावल गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब झालेला आहे. रस्त्याची चाळण झाल्याने यावल शहर व कोरपावली येथील नागरीक व शेतकऱ्यांची शेती माल, पिकांची वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. वाहनधारकांना रस्ताच नसल्याने हाल होत आहेत. रस्ता दुरूस्ती करण्यासाठी अनेक वेळा निवेदनही देण्यात आले परंतू संबंधित विभाग आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. तरी तातडीने या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने शनिवार १५ जानेवारी रोजी सकाळी पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक सरवर तडवी यांना देण्यात आले.

निवेदनावर उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, शहर उपप्रमुख संतोष धोबी, युवासेना शहरप्रमुख सागर देवांग, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, अल्पसंख्यांक आघाडी सेना तालुका संघटक अजहर खाटीक, शहर उपप्रमुख योगेश चौधरी, विभाग प्रमुख यागेश पाटील, भरत चौधरी, मयूर खर्चे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version