Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करण्याबाबत निवेदन

पारोळा प्रतिनिधी । शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना गटशिक्षण अधिकारी कविता सुर्वे यांच्यामार्फत अन्यायकारक शासन आदेश खाजगी अनुदानित व अशःत अनुदानित शाळेतील शिपाई पदांसाठी नियमित वेतनश्रेणी ऐवजी ठोक मासिक शिपाई भत्ता या विरूद्ध निषेध करण्यासाठी काळ्या फिती लावुन आंदोलनबाबत निवेदन देण्यात आले आहे. 

पारोळा तालुका टिडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, भाजप शिक्षक आघाडी, खाजगी शिक्षकेतर कर्मचारी, कलाघ्यापक संघ, शा.शि. शिक्षक संघटनानी निवेदन पाठविले मागण्या पुढीलप्रमाणे :-

१) राज्यातिल मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक शाळांसाठी सेवाशर्ती नियमावली नुसार शिपाई संवर्गातिल पदांची कर्तव्ये व जबाबदान्या विहित केल्या आहेत त्याचे पालन करण्यासाठी शाळेत सर्वात आधी येणारा व सर्वात शेवटी शाळेतुन बाहेर जाणारा सेवक म्हणून त्याची उपयुक्तता व ‘श्रमविविधता सर्वज्ञात आहे तसेच पदे सेवाशर्ती १९८१ अन्वये वैधानिक पदे असुन अनुसुची क मध्ये त्यांचे वेतनमान निर्धारीत आहे त्यामुळे मासिक शिपाई भत्ता ही संकल्पना बेकाय़देशीर ठरते.

२) शिवाय वरील निर्णयन्वये लागु केलेला ठोक मासिक भत्ता रू.५०००, ७५००, १०००० किमान वेतन कायदयाची पायमल्ली करणारा आहे.

३) शासनायी शिक्षकेतर आकृतीचा निकष समिती तत्कालीन शिक्षण आयुक्त भापकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती. या समितीच्या शिकारशी शासनास प्राप्त झालेल्या आहेत त्या समितीच्या शिफारशीकडे दुर्लक्ष करून हजारो विधमान शिपाई संवर्गातिल फ्दे व्यापगत करणे व एप्रील २०१९ पासुन नियमित वेतनाऐवजी ठोक मासिक शिपाई भत्ता निश्चित करणे अन्यायकारक आहे.

४) प्रगतशील पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राचे कंत्राटीकरण करणे राज्यातिल सर्वसामान्य गरीब व गरजु विदयाथ्याच्या शिक्षण सेवा प्रदान करण्यातील गतिरोधक असल्याने शिक्षणाच्या संधी नाकरणारे आहे.

११ डिसेंबर या बेकायदेशीर व शिक्षणाचे कंत्राटीकरण करणारा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करावा हे निवेदन देतांना टीडीएफ तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आर पी पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख पाटील, कलाध्यापक संघाचे एस जी झडप, क्रीडा शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप पवार,अनिल वाघ,देविदास हाटकर, एन टी पाटील, चद्रकांत पाटील, एस आर पाटील, अशोक पाटील, मधुकर देशमुख, एस डी आहीरे, आर एन पवार, एच एम गोहील, पी एच भोई, योगेश बोरसे, सुनिल सांळुखे, सुयोग जैन, सुकदेव चौधरी, उमांकात पाटील, प्रतिक भालेराव आदीजण उपस्थित होते.

 

 

Exit mobile version