Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविद्यालयात होणाऱ्या परिक्षा ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने घेण्याची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पर्याय उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव रोहित काळे आणि जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवेदनव्दारे केली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांना दोन्ही पर्याय हे उपलब्ध असावेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन करणे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी लसी घेतलेल्या नाही. फक्त ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांनाच ऑफलाईनसाठी परवानगी दिली गेली आहे. इतर विद्यार्थ्यांना ज्यांना कॉलेज ऑफलाईन यायला अडचणी असतील त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, असे त्यात नमुत केले गेले आहे. असे रोहित काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तरी ह्याच प्रमाणे परीक्षा सुध्दा झाल्या पाहिजे असे सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.

त्यात 80% अभ्यासक्रम हा ऑनलाइन शिकवला गेला आहे. त्यात बऱ्याच महाविद्यालयात होस्टेलची सोय नाही आणि होस्टेल हे शासनाच्या ताब्यात आहेत. तरी भल्यामोठ्या संकेनं विद्यार्थी येतील तर त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण होतो कारण कोविड मुळे विद्यार्थ्यांना रूम भाड्याने मिळत नाही तरी सर्वत्र विद्यार्थ्यांची मागणी ही आहे की ज्यांना ऑफलाईन देता येईल त्यांना ऑफलाईन आणि ज्यांना ऑनलाईन शक्य असेल त्यांच्या साठी ऑनलाईन कारण गेल्या वर्षी देखील ह्याच प्रकारे निर्णय झाला होता असे त्यांनी त्यात नमुत केले. ऑक्टोबर 2020 ला महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतले होते की प्रोफेशनल (व्यावसायिक) अभ्यासक्रम चे पेपर हे ऑनलाईन घेतले गेले पाहिजे आणि नॉन प्रोफेशनल अभ्यासक्रम चे पेपर हे ऑनलाईन आणि ऑफलाईन आसे दोन्ही पर्याय उपलब्ध करून घेतले गेले पाहिजे. UGC 2021 च्या परीक्षा संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे मध्ये सुद्धा दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात यावे या संदर्भात नमुत केले गेले आहे.

सोबत ज्यांचे दुसऱ्या लसीकरणाच्या दुसऱ्या डोस ची तारीख डिसेंबर मध्ये किंव्हा जानेवारी मध्ये आहे , त्यांना देखील महाविद्यालयात येता येणार नाही  आहे तरी या संदर्भात जे विद्यार्थी काही कारणास्तव येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी ऑनलाइन आणि जे येऊ शकतील त्यांच्या साठी ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे, असे रोहित काळे आणि रोहन महाजन यांनी म्हटले आहे.

 

 

Exit mobile version