Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलतर्फे कोरोना जगजागृती समिती गठीत करण्याबाबत निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंताच्या माध्यमातून कोविड-१९ संसर्गाविषयी जगजागृती करण्यासाठी शासनातर्फे जीआर आले असून जिल्ह्यात लवकरात लवकर समिती गठीत करुन कलाकारांना काम मिळावे, अशा आशयाचे निवेदन शहरातील राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे वरील संदर्भीय विषयानुसार राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंत यांच्या माध्यमातून covid-19 संसर्ग विषयी जनजागृती करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय दिनांक 5 मे 2019 रोजी शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील covid-19 तिचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. सदरचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावा याची जबाबदारी व त्या अनुषंगाने करण्यात येणारे लसीकरण, याबाबत राज्यातील प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलावंत याद्वारे समाजात जाणीव व जनजागृती करण्यासाठी वरील शासन निर्णयानुसार माझ्याजवळ आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय वरून भ्रमणध्वनीद्वारे कलावंतांचे निवेदन आलेले आहेत.

त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरील शासन निर्णयानुसार आपल्या जळगाव जिल्ह्याची समिती गठीत करून व समितीमध्ये ज्येष्ठ कलावंत यांचा सहभाग करून घेऊन योग्य संस्थाना व कलाकारांना वरील शासन निर्णयाच्या आधारे कलाकारांना विरही मुदतीत न्याय मिळवून द्यावी अशी विनंतीचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी  राष्ट्रवादी जळगाव जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक विभाग अध्यक्ष गौरव लवंगले, प्रमुख सलगर रमेश भोळे, दिग्दर्शक व कलाकार प्रदीप भोईसह कलाकार, गौरव मोरे, सांस्कृतिक सचिव विभावरी मोरांकर यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

 

Exit mobile version