Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे ॲग्रो डिलर्स असोसिएशनचे विविध मागण्यांचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विरूद्ध कठोर कारवाई करणेसाठी सध्या प्रचलीत असलेल कायदे पुरेसे असतांना ही राज्य शासनाकडून पुन्हा नविन नवे कायदे तयार करणेची प्रक्रीया सुरू झाली आहे. या निर्णयाच्या विरोधात माफदा व जिल्हा संघटनेकडून तसेच यावल येथे यावल तालुका अॅग्रो हिलर्स असोसिएशनच्या वतीने निषेध मोर्चा काढुन करण्यात येवुन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देण्यात आले .

यावल तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदन म्हटले आहे की , महाराष्ट्र शासनाकडील प्रस्तावित विधेयक क्रमांक४०,४१,४२,४३व४४ मधील जाचक वियमाना विरोध करण्यासाठी शासनाने प्रस्तावित पाच ही कायदे रद्द करणेसाठी , निषेध म्हणुन दिनांक २ नोव्हेंबर २०२३ते ३ नोव्हेंबर आणि ४ नोव्हेंबर या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असुन , सदरचा राज्य शासनानाने प्रस्तावित केलेले विधेयक विधीमंडळत दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी मांडण्यास आली व सदर चे पाच ही विधेयक मंजुर झाल्यानंतर विक्रत्यांसाठी विक्री व्ययसाय करणे अशक्यप्राय असल्याने तसेच विधेयक क्रमांक ४४नुसार , विक्रेत्यांना झोपडपट्टी गुंड , हातभट्टीवाले, वाळु माफिया ,तडीपार गुंड यांच्या रांगेमध्ये बसविण्याचे प्रस्तावित केलेले आहे . त्यामुळे विकेत्यांचा शेतकरी बांधवामध्ये असलेला विश्वास व स्थानिक समाजामध्ये असलेल्या प्रतिष्ठेस धोका निर्माण होणार आहे. तरी ही राज्य शासनाकडुन जाचक नियमाचे कायदे रद्द होणे बाबत कोणतीही कारवाई झालेली नाही आणी उलट जर शासनाकडून प्रस्तावित कायदे मंजुरीची कार्यवाही झाल्यास विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय चालु ठेवणे अशक्य होणार आहे .

प्रस्तावित कायदे रद्द व्हावे करीता शासनाच्या जाचक कायदाचा निषेध करून याकरीता यावल तालुका अॅग्रो डिलर्स असोसिएशन सह विविध राज्य पातळीवरील संघटनांच्या वतीने दिनांक २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील कृषी केंद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन , या सह विविध मागण्या संदर्भातील निवेदन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना देण्यात आले असुन या निवेदनावर वसंत पाटील , जोगेश्वरी कृषी केंद्र, दत्तकृपा कृषी केन्द्र , चौधरी अॅग्रो फैजपुर, कृषीरत्न अॅग्रो, प्रगती अॅग्रो , पाटील ट्रेडर्स, मातोश्री अॅग्रो यावल , धनशक्ती इरीगेशन यावल , ओम अॅग्रो यावल , अमोल ट्रेडर्स भालोद, लक्ष्मीनारायण ट्रेडर्स हिंगोणा , एम एस एजन्सीज यावल यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य कृषीकेन्द्र संचालकांच्या स्वाक्षरी आहेत

Exit mobile version