Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘अनाधिकृत अतिक्रमण काढावे’ या मागणीसाठी व्यापाऱ्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जिनिंग प्रेसिंग संकुल समोरील अनाधिकृत अतिक्रमणामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ‘अनाधिकृत अतिक्रमण काढावे’ या मागणीसाठी यावलचे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले.

यावल येथील जिनिंग प्रेसिंग संकुल समोरील यावल-चोपडा या सर्व संकुलला लागून अनाधिकृत अतिक्रमणामुळे रहदारीस वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याला लागून सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात अनाधिकृत अतिक्रमण झाले आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे सर्व प्रकारच्या गाळेधारकांचे दुकाने दिसत नसल्याने व्यवसायावर मोठया प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. सदरील अनाधिकृत अतिक्रमणधारक यांच्यापासून मोठया प्रमाणात अडचण निर्माण होत आहे.

नगरपालिका यावल आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल यांच्या कार्यक्षेत्रात आणि मालकीच्या शासकीय जागेवर रस्त्याच्या आजुबाजूस झालेल्या अतिक्रमित, अनाधिकृत जागांवर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण करून आपले अनाधिकृत उद्योग, व्यवसाय सुरू केले आहेत. काहींनी यावल नगरपरिषदेची तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाची कोणतीही लेखी / अधिकृत परवानगी न घेता पत्री शेडची दुकाने उभारली आहेत.

बऱ्याच वेळेला गाळेधारक अनाधिकृत अतिक्रमण धारकांना समजवण्यास गेले असता त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी व जातीवाचक शिवीगाळ सदरील अतिक्रमणधारक करीत असतात. अतिक्रमणामुळे किरकोळ भांडणे होत आहेत. अनेक वेळेला अतिक्रमणाबाबत अनेकांच्या लेखी व तोंडी तक्रारी संबंधितांकडे आहेत एखाद्या वेळेस मोठी जिवित व आर्थिक हानी होण्याची दाट होण्याची शक्यता आहे. तसेच कायदा-सुव्यवस्था, शांतता धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी आपण तात्काळ निर्णय घेऊन अतिक्रमण काढणेसाठी, हटविण्यासाठी ठोस कार्यवाही करावी अशी मागणी गाळेधारक व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version