सामूहिक अत्याचारसंदर्भात मुस्लिम शिष्टमंडळाचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील एका गावात झालेल्या सामूहिक अत्याचार संदर्भात शहनिशा करत त्याची चौकशी करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन मुस्लिम शिष्टमंडळाने बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यातील एका प्रसार माध्यमातून जळगावात मुस्लिम मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची बातमी प्रसारित केली जात आहे. दरम्यान या बातमीची शहनिशा करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, जर सदरचे वृत्त खोटे असेल तर पोलीसी प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात जळगाव शहरातील मुस्लिम शिष्टमंडळाने बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना निवेदन दिले आहे.

याप्रसंगी मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सैयद चाँद, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मजहर खान, जळगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष नदीम काझी, ह्यूमन राईट फोरम जळगावचे अन्वर खान, सामाजिक कार्यकर्ते शौकत पेंटर व प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव बाबा देशमुख यांची उपस्थिती होती

Protected Content