तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गवळी समाजाचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जालना येथील एका हॉस्पिटलमध्ये पोलीसांनी पदाचा गैरवापर करून तरूणाला बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली होती. पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलीसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या जळगाव शाखेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना आज सोमवारी सकाळी दिले.

महाराष्ट्र गवळी समाज संघटन जळगाव शाखेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना येथे 9 एप्रिल रोजी दिपक हॉस्पिटलमध्ये एका घटनेत दरम्यान पोलीस उप अधिक्षक सुधीर खिरोडकर यांनी गवळी समाजाला संबोधून अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली आणि गवळी समाजाच्या शिवराज नारियलवाले (गवळी) या तरूणाला दोन्ही अधिकाऱ्यांसह 5 ते 6 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी लाथा, बुक्के व काठ्यांनी अतिशय निर्दयीपणे बेकायदेशीर रीत्या व अमाणूषपणे बेदम मारहाण करून आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे.

याप्रकरणी संपूर्ण मारझोड व जातीवाचक शिवीगाळीचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्याने हि अमाणूसपणाची मारझोड व गवळी समाजाची बदनामी झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गवळी समाजामध्ये असंतोष व संतापाची लाट पसरली आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर शासन झाले पाहिजे अशी मागणी केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देतांना, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष दिलीप यमगवळी, युवा जिल्हा कार्याध्यक्ष उमाजी गठरी, विभागीय प्रतिनिधी संतोष जानगवळी, युवा उपाध्यक्ष शरद जानगवळी, जळगाव शहराध्यक्ष अनिल उदिकर, सदस्य गणेश निस्ताने आदींची उपस्थिती होती.

Protected Content