Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथे भाजपाच्या वतीने गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात निवेदन

अमळनेर प्रतिनिधी । गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीचे निवेदन भाजपाने  तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. 

राज्याचे माजी पोलिस आयुक्तांनी गृहमंत्र्यांनी दरमहा १०० कोटीची मागणी केल्या बाबत लेखी स्वरूपात तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली असुन गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे त्यांनी म्हटले आहे.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लिखित स्वरूपात पत्र देत सणसणीत आरोप केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की, मला तुम्ही प्रति महिन्याला १०० कोटी रुपये जमा करून द्यावे. एकुण हा गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला. राज्याच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा जर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर भाजपा प्रदेश विधिसेल सदस्य अॅड. व्ही. आर. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस राकेश पाटील,उमेश महाराज (दहिवद) उपस्थित होते.

Exit mobile version