Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पी.पी.आर.एल.च्या ‘मेरा घर’ योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

PPRL mera ghar

जळगाव, प्रतिनिधी | रियल इस्टेटच्या क्षेत्रात राज्यात अग्रेसर असलेल्या पी.पी.आर.एल. कंपनीच्या ‘मेरा घर’ या प्रॉपर्टी एक्सचेंज योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ही योजना अतिशय अनोखी असून त्याबद्दल माहिती मिळताच ग्राहक आणि गुंतवणूकदारांचा त्याकडे ओढा वाढत आहे.

 

या योजनेंतर्गत ‘मेरा घर’ या योजनेत घर घेवू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी इथे घर विकत घेण्यासाठी घराच्या किमतीच्या ५० टक्के एवढीच रक्कम अदा करायची असून ५० टक्के रकमेच्या मोबदल्यात त्याने आपली राज्यातील कुठलीही प्रॉपर्टी कंपनीला द्यायची आहे. तसेच जर ग्राहकाला गृहकर्ज करायचे असेल तर त्याला कुठलीही आगाऊ रक्कम देण्याची गरज नसेल. तसेच केवळ गुंतवणूक म्हणून घर विकत घेणाऱ्यांना तर या योजनेत दुहेरी लाभ मिळणार आहे. त्यांना त्यांची गुंतवलेली रक्कम काळानुसार वाढण्याचा लाभ तर मिळेलच शिवाय तोपर्यंत घर भाड्यातून उत्पन्न मिळण्याची हमीही असेल. या योजनेत घर खरेदी करण्यासाठी आलेल्यांना कुठलेही अदृश्य चार्जेस किंवा जी.एस.टी. भरावा लागणार नाही. या योजनेला वाढत असलेला प्रतिसाद बघता इच्छुकांनी त्वरित घर खरेदी करण्यासाठी राजेंद्र सूर्यवंशी यांच्याशी ८३८०० ३३७७९ आणि ७०३०९ ५७९०५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

Exit mobile version