Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘ग्रामरोजगार सेवक संघर्ष संघटने’ची राज्यस्तरिय सभा संपन्न

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘मारूळ’ येथील अरबी मदरशाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवकांची राज्य पातळीवरील तालुक्यातील पहीलीच सर्व साधारण सभा घेण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी ‘मारूळ’ सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद अहमद जावेद हे होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, “ग्रामरोजगार सेवक हा घटक देशात फार महत्वाचा असून केंद्र व राज्य सरकारचा निधी शासकीय योजनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लाभार्थी, शेतकरी, भूमिहीन अल्पभूधारक शेतकरी यांच्यापर्यंत पोहचविणे बेरोजगार मजुरांच्या हाताला शासनाच्या माध्यमातून काम मिळवून देणे. असे कार्य करणारा महत्त्वाचा दुवा असूनसुद्धा आज दुर्लक्षित आहे.

ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती ही अर्धवेळ आहे. परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांना दिवसभर पूर्णवेळ काम करावे लागते. केलेल्या कामाचा मोबदला हा पाहिजेत त्या स्वरूपात मिळत नाही. गेल्या १४ वर्षापासून ग्राम रोजगार सेवक हे आपल्या विविध मागण्या शासन दरबारी मागत आहे. परंतु अद्यापही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. शासनाने त्यांना कायम सेवेत समावून घेऊन मासिक मानधन दिले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळेल. यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.” असे प्रतिपादन त्यानी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले.

तसेच यावेळी ग्राम रोजगार सेवक संघटनेची नवीन राज्य कार्यकारिणी व विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवीन स्थापन झालेली ग्राम रोजगार सेवक ग्राम रोजगार संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विलास जोगदंडे यांची निवड करण्यात आली. यवतमाळ कार्याध्यक्ष देवदत्त साळवे, महासचिव राजेंद्र जिचकार, नागपूर सहसचिव रंजय केवट, नागपूर मदन खरात महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे नरेंद्र अरबट तुळशीदास बोकडे, दयानंद कांबळे, कैलास राठोड, कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे, प्रसिद्धीप्रमुख सागर डोंगरे, विभाग प्रमुख संजय पवार, राज्य संघटक प्रमुख रामकिशन इकतवार, रमेश बसीने, सुभाष सपकाळे, चंद्रशेखर शिरोडे, आजिनाथ ताटे, अंबादास वाहुरवार, किशोर पिलारे, कचरू मेघारे, संतोष रोकडे, दीपक गवई, देवराव लक्ष्मण गडचिरोली उमेश पाचे, कैलास जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य गौतम भदर्गे, देविदास दैविले, राज्य संघटकपदी खुशाल पाटील, राज्य सल्लागार सुरेश पाटोळे, सेवक्रम नागफासे यांची लोकशाही मार्गाने बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्रतील ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यावल संजय गांधी निराधार समितीचे सदस्य जावेद अहमद सय्यद म.प.सह. सोसायटीचे चेअरमन जियाउलहक सय्यद, व्हाईस चेअरमन मसरूर अली सय्यद, उपसरपंच सलामत अली सैय्यद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, नरेश मासोळे, युवा तालुका अध्यक्ष सुलतान पटेल, अल्पसंख्यांक विभागाचे यावल तालुकाध्यक्ष इखलासभाई सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मतीउर रहमान पिरजादे, माजी ग्रा.प.सदस्य कबीरुद्दीन फारुकी, मोईनुद्दीन ख्खाजा, प्रवीण हातकर, हसरत अली सय्यद. मोहब्बत अली. सय्यद भु-यामामू, सिध्दार्थ तायडे, सौरभ तायडे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल तालुका ग्राम रोजगार संषर्ष संघटनेचे उपाध्यक्ष दिपक कोळी, सचिव ईश्वर अडकमोल, विजय सपकाळे, संतोष सोनवणे, सुनिल सोनवणे व सर्व ग्रामरोजगार सेवक बांधवांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version