Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखिल भारतीय तांडा सुधार समितीची राज्यस्तरीय कार्यकारिणी घोषित

 वाशीम प्रतिनिधी । मागील २० वर्षांपासून बंजारा समाजाच्याच नव्हे तर विमुक्त-भटक्यांसकट संपूर्ण अभावग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी (दि. २४ एप्रिल २१) रोजी ऑनलाईन सभेत घोषित करण्यात आली. 

अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत अखिल भारतीय तांडा सुधार समितीची राज्यस्तरीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या प्रसंगी आपले विचार मांडताना त्यांनी “समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, धर्मभोळेपणा या गोष्टी समाजाला विकासापासून कोसो दूर नेत आहेत. त्यामुळे समाजाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाकरिता विज्ञानवादी मंडळींनी पुढे येण्याची गरज आहे” असे मत मांडले. अ. भा. तांडा सुधार समिती ही परिवर्तनवादी व बुद्धिप्रामाण्यवादी विचाराची संघटना आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी घोषित करताना अंधश्रद्धा, धर्मांधता आणि जातीयता मानणारी माणसे राज्य कार्यकारिणीत घेण्याचे जाणीवपूर्वकच टाळली गेली. 

नवी कार्यकारिणी अशी :-

अध्यक्ष        : डॉ. विजय जाधव, वाशीम.

कार्याध्यक्ष   : श्रीपत राठोड, नागपूर.

उपाध्यक्ष    : योगेश्वर राठोड, चाळीसगांव.

पंतुसिंग राठोड, वर्धा.

महासचिव  :  श्रावण जाधव, मालेगाव.

सचिव       : सुभाष चव्हाण, रामटेक.

सहसचिव  :  रमेश पवार, अकोला.

कोषाध्यक्ष : पी. के. पवार, अकोला. प्रसिद्धीप्रमुख : गोरख गोफणे, जळगाव. प्रवक्ते :  दत्ता पवार, नागपूर.

महिला आघाडी प्रमुख :  कविता राठोड, यवतमाळ            

महिला आघाडी उपप्रमुख

प्रा. डॉ. मनोरमा राठोड, बुलढाणा,

अरुणा जाधव, वाशीम.

सभेला प्रा. डॉ. रमेश राठोड, अकोला, मा.नामा बंजारा, नागपूर, प्रा. सरदार राठोड, मोहन जाधव, नागपूर आदी मान्यवरांची होती.

 

 

Exit mobile version