Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेगाव येथे राजपूत महिलांचे राज्यस्तरीय अधिवेशन

WhatsApp Image 2019 11 11 at 3.42.48 PM

शेगाव, विशेष प्रतिनिधी | अखिल भारतीय क्षत्रिय महासभा,महाराष्ट्र प्रदेश आयोजित शेगाव येथील राज्यस्तरीय अधिवेशनात राजपूत महिला माता भगिनींनी आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्तणे सहभाग नोंदविला. मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील राजपूत समाज बांधव हजर होते.

नुकतेच शेगाव येथील मथुरा लॉन्सच्या सभागृहात अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत महिलांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार हरिवंश सिंह ठाकूर, राष्ट्रीय विरांगणा महिला अध्यक्ष दमयंती रॉय, अभाक्षम तो प्रदेश सलाहकार मार्गदर्शक तथा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ठा. राजेंद्रसिंह राजपूत, राष्ट्रीय युवा अध्यक्ष डॉ.भागवत राजपूत. महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उज्वला पाटिल, खामगाव माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, घाटंजीच्या नगराध्यक्षा नयना ठाकूर, अमरावती विभागीय महिला अध्यक्ष भारती सिसोदिया, नाशिक विभागीय युवा अध्यक्ष संग्रामसिंह सुर्यवंशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार हरिवंश सिंह ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणातून राजपूत समाज संघटन करत सर्वांना सोबत घेऊन विधायक कार्य करण्याच्या संदर्भात हिंदू सूर्य महाराणा प्रताप, मा पद्मावती यांचे प्रेरणादायी विचारांचे ऐतिहासिक कथन करत मार्गदर्शन केले. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचा महिला अधिवेशन आयोजन करण्याचा हा स्तुत्य उपक्रम असून, राजपूत महिलांनी एकत्र येत विचारांची देवाण-घेवाण करण्याच्यादृष्टीने याठिकाणी सर्वांना व्यासपीठ मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र सिंह राजपूत यांनी महिला अधिवेशन काळाची गरज असल्याचे सांगत संघटनेच्या कार्यात महिलांनी तसेच युवती आणि युवांनी हिरीरीने सहभागी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रीय अध्यक्ष दमयंती रॉय यांनी महिला सक्षम तर समाज सक्षम असे स्पष्ट केले. महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ उज्वला पाटिल यांनी महिलांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबवत समाजाचा पाठीचा कणा या नात्याने समाज उद्धारासाठी पुढे आले पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन वरिष्ठ संगठन मंत्री प्रदेश महिला प्रकोष्ठ सुनिता राजपूत आणि प्रदेश कार्यकारी सदस्य डाँ. रतनसिंह यांनी केले तर आभार उज्वला पाटील यांनी मानले. अधिवेशनास मुंबई, ठाणा, नाशिक, जळगाव धुळे, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, औरंगाबाद अशा विविध विभागनिहाय पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेशचे सर्व पदाधिकारी, महिला आणि युवा पदाधिकारी, विशेषत: मिडिया प्रमुख स्वामी पाटील, युवा संगठनमंत्री अभयसिंह राजपूत तसेच इतर सर्वानी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version